साडे अकरा लाखांची वाळू जप्त महसूल, पोलिसांची संयुक्त कारवाई !

Foto
पैठण:  तालुक्यातील टाकळी अंबड, आवडे उंचेगाव येथील गोदापात्रात रात्रंदिवस अनाधिकृत वाळू उपसा सुरू असल्याची माहिती मिळाली असल्याने तहसीलदार व पोलिस उपविभागीय अधिकारी स्वप्निल राठोड यांनी मंगळवारी रात्री 2 वाजता छापा मारून टाकळी अंबड येथुन 105 ब्रास वाळूसाठा जप्त केला. तसेच आवडे उंचेगाव येथे रात्री 3:50 वाजेच्या सुमारास धाड टाकून 125 ब्रास वाळूसाठा जप्त केला. 

या दोन्ही ठिकाणी एकूण 11 लाख 50 हजाराच्यावर किंमतीचे 230 ब्रास वाळूसाठा जप्त करून ताब्यात घेण्यात आला. तहसीलदार पैठण महेश सावंत व उपविभागीय पोलिस अधिकारी स्वप्नील राठोड यांनी टाकलेल्या संयुक्त धाडीत मोठ्या प्रमाणात वाळूसाठा जप्त करण्यात आला. हे अनाधिकृत वाळू उत्खनन पाचोड पोलिस ठाण्यात हद्दीत सुरू असताना या अनाधिकृत वाळू उत्खननाकडे पाचोड पोलिस अर्थ पूर्ण दुर्लक्ष करत आहेत. या कारवाईत तलाठी अनिल हुग्गे, पो.कॉ. पठाण, कोतवाल सतिश दळवी, चालक गायकवाड हे पथकात सामील होते. दरम्यान पैठण हद्दीत आपेगाव, कुरण पिंपरी, जूने कावसान येथे सुद्धा रात्री मोठ्या प्रमाणात वाळू उत्खनन सुरू असल्याचे समजते.

Jewelroof by RC Bafna JewellersShare Business Card - Free Digital Card Maker